Temple Trails of South : ‘टेंपल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ भारत गौरव ट्रेन

भाविकांसाठी १२ रात्रींची आध्यात्मिक सफर, मनमाड येथून आयआरसीटीसीची नवी आध्यात्मिक यात्रा

Total Views |
Temple Trails of South
 
मुंबई : (Temple Trails of South) महाराष्ट्रातील भाविक आणि पर्यटनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी मनमाड येथून ‘टेंपल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ (Temple Trails of South) या विशेष भारत गौरव पर्यटन रेल्वेची सुरुवात होत आहे. दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि सांस्कृतिक वारसा स्थळांचा समावेश असलेली ही १२ रात्री, १३ दिवसांची विशेष यात्रा सध्या भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनमाड, नाशिक रोड, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा आणि मिरज या स्थानकांवरून प्रवासी चढ-उतार करू शकणार असल्याने महाराष्ट्रातील विविध भागांतील यात्रेकरूंना ही सुविधा सहज उपलब्ध होणार आहे.(Temple Trails of South)
 
आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले की, ही विशेष संमिश्र एसी/ नॉन-एसी ट्रेन सुमारे ७५० प्रवाशांना दक्षिणेतील पवित्र आणि ऐतिहासिक स्थळांची सफर घडवणार आहे. मुरुडेश्वरचे भव्य शिवमंदिर, गुरुवायूर, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारक, तिरुवनंतपुरम, तिरुचिरापल्ली, कांचीपुरम आणि महाबलीपुरम येथील शोर टेंपल यांसारखी प्रसिद्ध स्थळे या यात्रेत समाविष्ट आहेत.(Temple Trails of South)
 
हेही वाचा : Mumbai Railway : हार्बर मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद
 
सुविधा नेमक्या कोणत्या?
 
प्रवाशांसाठी इकॉनॉमी स्लीपर, स्टँडर्ड थ्री एसी आणि कम्फर्ट टू एसी असे पर्याय उपलब्ध आहेत. संपूर्ण पॅकेजमध्ये रेल्वे प्रवास, बजेट हॉटेलमध्ये निवास (डबल/ट्रिपल/क्वॉड शेअरिंग), संपूर्ण शाकाहारी भोजन, स्थानिक एसी/नॉन-एसी बसद्वारे दर्शन व्यवस्था, सर्वसमावेशक प्रवास विमा आणि आयआरसीटीसी टूर मॅनेजरची सेवा यांचा समावेश आहे. त्यामुळे भाविकांना स्वतंत्र नियोजनाची धावपळ करावी लागणार नाही.(Temple Trails of South)
 
दर नेमके काय?
 
दर रचनेनुसार इकॉनॉमी क्लाससाठी २३ हजार ३७०, थ्री एसीसाठी ३६ हजार ९९० आणि टू एसीसाठी ४८ हजार ७६० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. बुकिंग ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ तत्त्वावर सुरू असून आयआरसीटीसीच्या पर्यटन संकेतस्थळावरून नोंदणी करता येईल. ही यात्रा केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणारी आहे.(Temple Trails of South)
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.