मुंबई : (Bollywood actor Nawazuddin Siddiqui) बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा आपल्या जुन्या मित्रासाठी, अभिनेता राजपाल यादवच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याची माहिती समोर आली आहे. वैयक्तिक आणि कायदेशीर अडचणींना सामोरे जात असलेल्या राजपाल यादवला नवाजुद्दीनने कोणताही गाजावाजा न करता गुपचूप आर्थिक मदत केली असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. (Bollywood actor Nawazuddin Siddiqui)
विशेष म्हणजे या मदतीबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीने कुठेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही, साधी जीवनशैली आणि खासगी आयुष्य प्रकाशझोतात न आणण्यासाठी त्यांची ओळख आहे. जवळच्या मंडळींच्या मते, ही मदत केवळ मैत्री म्हणून करण्यात आली असून त्यामागे प्रसिद्धी मिळवण्याचा कोणताही हेतू नाही. “चांगली कामं शांतपणे करावीत,” या विचारावर नवाजुद्दीन ठाम असल्याचं सांगितलं जातं. (Bollywood actor Nawazuddin Siddiqui)
हेही वाचा:‘सुपर डुपर’मधून उलगडणार कौटुंबिक नात्यांची गोष्ट
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन यांनी यापूर्वीही राजपाल यादव यांना मदतीचा हात दिला होता. काही काळापूर्वी सुमारे १० लाख रुपयांची मदत केल्याचा दावा केला जातो. मात्र त्यावेळीही त्याने कुठेही त्याचा उल्लेख केला नव्हता. मदत करणे हे मानवी कर्तव्य आहे, प्रसिद्धीचं साधन नाही, अशीच त्याची भूमिका राहिली आहे. (Bollywood actor Nawazuddin Siddiqui)
दरम्यान, राजपाल यादवच्या अडचणींमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू होत्या. “अवघड काळात इंडस्ट्रीतील मित्र कुठे आहेत?” असा सवाल काही जणांनी उपस्थित केला होता. अशातच नवाजुद्दी हे सातत्याने राजपाल यादव यांच्या संपर्कात असून शक्य ती मदत करत असल्याची माहिती समोर आल्याने चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला जात आहे. (Bollywood actor Nawazuddin Siddiqui)