Tata Indian Institute of Skills : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रगत तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

    12-Feb-2026
Total Views |
Tata Indian Institute of Skills
 
मुंबई : (Tata Indian Institute of Skills) आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे, उद्योगसुसंगत व आधुनिक तंत्रज्ञानाधारित कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स, मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.(Tata Indian Institute of Skills)
 
या करारान्वये २४० आदिवासी विद्यार्थ्यांना प्रगत औद्योगिक तंत्रज्ञान विषयक विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मंत्रालय, मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे (Tata Indian Institute of Skills) मुख्य वित्त अधिकारी मयंक पलन यांनी करारावर स्वाक्षरी केली.(Tata Indian Institute of Skills)
 
हेही वाचा : Sea Food Market : भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी बाजार मुंबईत उभारणार
 
आदिवासी युवकांना प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे हा विभागाचा प्राधान्यक्रम असल्याचे सचिव विजय वाघमारे यांनी यावेळी सांगितले.(Tata Indian Institute of Skills)
 
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये प्रशिक्षण, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण तसेच उद्योगमानक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सकडून (Tata Indian Institute of Skills) पार पाडली जाणार आहे.