मुंबई: (Ritu Tawde) संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेला अखेर महापौर मिळाला. भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. विरोधात एकही उमेदवार नसल्याने दोघांची बिनविरोध निवड झाली होती. बुधवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते पदभार स्वीकारताच जवळपास तीन वर्षे सुरू असलेला प्रशासक काळ संपुष्टात आला आणि मुंबईत पुन्हा ‘मेयर राज’ आले. (Ritu Tawde)
महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौरपदासाठी भाजपचा मार्ग आधीच मोकळा झाला होता. भाजपने रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, तर शिंदे सेनेने उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांना उमेदवारी दिली. संख्याबळ नसल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाने उमेदवारच दिला नाही आणि निवडणूक बिनविरोध झाली. (Ritu Tawde)
महापौर आणि उपमहापौर पदभार स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनपा मुख्यालयात उपस्थित होते. त्यांच्या आगमनानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाकडूनही घोषणांनी सभागृह दणाणून सोडले होते. (Ritu Tawde)
भाजपच्या दुसऱ्या महापौर आणि पहिल्या महिला महापौर...
या निवडीनंतर रितू तावडे या भाजपच्या मुंबईतील दुसऱ्या महापौर ठरल्या आहेत. यापूर्वी १९८२ साली प्रभाकर पै यांनी हा मान मिळवला होता. तावडे या भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर ठरल्या आहेत. घाटकोपरच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिलं असून शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांचा अनुभव आहे. (Ritu Tawde)
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने घाटकोपर पश्चिम येथील नगरसेविका रितू राजेश तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. सलग तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या तावडे या पालिकेच्या शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा राहिल्या आहेत. सध्या त्या महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा, ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तसेच मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. (Ritu Tawde)
घाटकोपर पश्चिममधील प्रभाग क्रमांक १३२ हा गुजराती बहुल मतदारसंघ मानला जातो. मात्र तावडे या मराठा समाजातील असून ठाम मराठी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. निवड झाल्यास त्या मुंबईतील भाजपच्या पहिल्या महिला महापौर ठरतील. (Ritu Tawde)
रितू तावडे यांचा राजकीय प्रवास हा स्थानिक प्रश्नांशी जोडलेला राहिला आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून काम करताना पालिका शाळांमधील सुविधा, गुणवत्ता आणि पायाभूत सुधारणा यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या निवडीमुळे घाटकोपर आणि ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Ritu Tawde)
ठाकरे गटाची २४ वर्षांची सत्ता संपली...
मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सत्ता होती. मात्र यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांना सत्तेबाहेर जावं लागलं. त्यामुळे मुंबईतील राजकारणात हा मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे.
नव्या नियमांनुसार, महापौर निवड प्रक्रियेत आयुक्त भूषण गगराणी हेच पीठासीन अधिकारी होते. पूर्वी हा अधिकार मावळते महापौर किंवा ज्येष्ठ नगरसेवकाकडे असायचा. नियम बदलल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला. मात्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे अधिकार देण्यात आल्याने गगराणी यांनीच प्रक्रिया पार पाडली.