जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तक प्रकरणी 'पेंग्विन इंडिया'ला नोटीस! नेमकं प्रकरण काय आहे?

11 Feb 2026 13:21:00

General Naravane

मुंबई : (General Naravane Unpublished Book Controversy) माजी लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या अप्रकाशित पुस्तकावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अद्याप प्रकाशित न झालेल्या या पुस्तकाच्या प्रती वितरित झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता दिल्ली पोलिसांनी या पुस्तकाची प्रकाशक कंपनी असलेल्या पेंग्विन इंडियाला नोटीस पाठवली आहे.(General Naravane Unpublished Book Controversy)

माध्यमांमधून समोर आलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पेंग्विन इंडियाला नोटीस बजावली आहे. या नोटिशीद्वारे अनेक प्रश्न विचारण्यात आले असून त्यांची उत्तरे मागवण्यात आली आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.पेंग्विन इंडियाने हे पुस्तक भारतात प्रकाशित झालेले नाही, असा दावा केला होता. त्यानंतर पुस्तक स्वरुपात आणि डिजिटल स्वरुपामध्ये त्याच्या प्रती वितरित कशा झाल्या याचा तपास दिल्ली पोलिस करत आहे. यानंतर पुस्तकासंदर्भात सुरू असलेल्या वादावर व्यक्त होत जनरल नरवणे यांनी 'पेंग्विन इंडिया'ने मंगळवारी 'एक्स'वर प्रसिद्ध केलेले निवेदन शेअर केले आणि त्याबरोबर 'ही पुस्तकाची सद्यस्थिती आहे,' असे म्हटले आहे.(General Naravane Unpublished Book Controversy)

पेंग्विन इंडियाने काय म्हटले?

या प्रकरणात पेंग्विन प्रकाशनाला दोन दिवसांत दोन स्पष्टीकरणे 'एक्स'वरून प्रसिद्ध करावी लागली आहेत.
 
पहिले स्पष्टीकरण त्यांनी ९ फेब्रुवारी रोजी एक निवेदन स्पष्ट करुन दिले होते. त्यात ते म्हणाले होते की, "सध्याची चर्चा आणि माध्यमातील वृत्त पाहून पेंग्विन रँडम हाऊस इंडिया हे स्पष्ट करू इच्छितं की, 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' प्रकाशित करण्याचे सर्व अधिकार आमच्याकडे आहेत. हे पुस्तक भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणेंनी लिहिले आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की अद्याप हे पुस्तक प्रकाशित झालेले नाही. पुस्तकाची कोणतीच कॉपी - प्रिंट किंवा डिजिटल फॉर्ममध्ये...अद्याप प्रकाशित, वितरित, विकली गेली किंवा पब्लिकसाठी आमच्याकडून उपलब्ध करण्यात आलेली नाहीये.(General Naravane Unpublished Book Controversy)

...तर कायदेशीर कारवाई करणार

"जी पण कॉपी सध्या सर्कुलेशनमध्ये आहे...मग ते पूर्ण पुस्तक असो वा त्याचा काही भाग, मग ते प्रिंटमध्ये, डिजिटलमध्ये, पीडीएफमध्ये या कोणत्याही फॉर्मॅटमध्ये, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असो...ते पेंग्विन रँडम हाऊसच्या कॉपीराइटचे उल्लंघन आहे आणि ते तत्काळ थांबवले गेले पाहिजे. जे चुकीच्या मार्गाने पुस्तकाच्या प्रती वितरित करत असतील तर त्यांच्या विरोधात पेंग्विन रँडम हाऊस कायदेशीर कारवाई करेल," असं पेंग्विनने म्हटले आहे.(General Naravane Unpublished Book Controversy)

पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत पेंग्विन इंडियाकडून माहिती

दुसरे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर देण्यात आले. राहुल यांनी नरवणे यांच्या ट्विटचा संदर्भ देत हे पुस्तक प्रकाशित झाल्याचा दावा केला होता. दुसऱ्या स्पष्टीकरणात, भारतातील पुस्तक प्रकाशनाची प्रक्रिया कशी आहे याबाबत पेंग्विन इंडियाने सांगितले. पेंग्विन इंडियाने म्हटले, "कोणत्या पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणा, त्याची प्री-ऑर्डर उपलब्ध होणे आणि मुळात पुस्तक प्रकाशित होणं या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि तिन्ही वेगळ्या प्रक्रिया आहेत. एखादे पुस्तक अमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवर प्री-ऑर्डरसाठी दिसणे किंवा त्याची भविष्यातील प्रकाशनाची तारीख निश्चित होणे हे सांगत नाही की संबंधित पुस्तक प्रकाशित झाले आहे. पेंग्विनचे म्हणणे आहे की, पुस्तक त्याच वेळी प्रकाशित मानले जाऊ शकतो जेव्हा ते रिटेल प्लॅटफॉर्मवर (दुकानात) थेट विक्रीसाठी उपलब्ध असेल."(General Naravane Unpublished Book Controversy)

नेमका वाद काय आहे?

जनरल नरवणेंच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' यांच्या पुस्तकामध्ये चिनी घुसखोरीसंदर्भात माहिती देण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केला होता. इतकेच नाही तर राहुल गांधींनी या पुस्तकातील काही उतारे लोकसभेत वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्याला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोध केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी या पुस्तकाची प्रत संसदेच्या आवारात पत्रकारांना दाखवत हे पुस्तक उपलब्ध असल्याचा दावा केला होता.(General Naravane Unpublished Book Controversy)

Powered By Sangraha 9.0