कॅनडा: (9 dead in Canada school shooting) कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील टम्बलर रिज येथे एका हायस्कूलमध्ये झालेल्या अंदाधूंद गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण कॅनडा हादरला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात आरोपीसह जवळपास ९ जणांचा मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. (9 dead in Canada school shooting)
मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी टम्बलर रिज माध्यमिक शाळेत ही घटना घडली. या शाळेत सातवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. स्थानिक वेळेनुसार दुपारी १:२० च्या सुमारास पोलीस गोळीबाराची माहिती मिळताच, पोलीस आणि रुग्णवाहिका पथके घटनास्थळी दाखल झाली. सध्या खबरदारी म्हणून शाळेचा संपूर्ण परिसर बंद करण्यात आला असून पालकांना आणि नातेवाईकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय परिस्थिती लक्षात घेऊन शाळा आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेचा तपास वेगाने सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. (9 dead in Canada school shooting)
दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले की, टम्बलर रिज येथे झालेल्या या भयंकर गोळीबारामुळे मी अत्यंत व्यथित आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. कॅनडा सरकार पीडितांना मदत करण्यासाठी ब्रिटिश कोलंबियासोबत ठामपणे उभे आहे. तसेच आपत्कालीन सेवांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. (9 dead in Canada school shooting)
<!-- Inject Script Filtered -->
कॅनडातील शाळांमधील गोळीबार...
१९७५ – ब्रॅम्प्टन सेंटेनियल सेकंडरी स्कूल, ओंटारियो
१६ वर्षांच्या विद्यार्थ्याने गोळीबार केला. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले. आरोपीने नंतर आत्महत्या केली.
१९७५ – सेंट पायस एक्स हायस्कूल, ऑटावा
१८ वर्षांच्या विद्यार्थ्याने वर्गात गोळीबार केला. २ जणांचा मृत्यू, ४ जखमी. आरोपीने नंतर आत्महत्या केली.
१९७८ – स्टर्जन क्रीक स्कूल, विनिपेग
१७ वर्षांच्या विद्यार्थ्याने १६ वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या केली.
१९८९ – इकोल पॉलिटेक्निक, मॉन्ट्रियल
कॅनडाच्या इतिहासातील सर्वात भीषण शैक्षणिक गोळीबारांपैकी एक. २५ वर्षांच्या मार्क लेपीनने १४ महिला विद्यार्थी आणि १ कर्मचाऱ्याची हत्या केली; १३ जखमी झाले.
१९९९ – डब्ल्यू. आर. मायर्स हायस्कूल, टेबर, अल्बर्टा
१४ वर्षांच्या विद्यार्थ्याने गोळीबार करून १ जणाचा मृत्यू व १ जखमी केला.
२००४ – ब्रॅमलिया सेकंडरी स्कूल, ब्रॅम्प्टन, ओंटारियो
घरगुती वादातून शिक्षिकेच्या पतीने शाळेच्या पार्किंगमध्ये तिला गोळी घालून ठार केले. विद्यार्थ्यांना दुखापत झाली नाही.
२००६ – डॉसन कॉलेज, मॉन्ट्रियल
२५ वर्षांच्या किमव्हिअर गिलने हल्ला केला. १ महिला ठार, २० जखमी. पोलिस कारवाईदरम्यान आरोपीने आत्महत्या केली.
२००७ – सी.डब्ल्यू. जेफ्रीज कॉलेजिएट इन्स्टिट्यूट, टोरोंटो
१५ वर्षांचा विद्यार्थी जॉर्डन मॅनर्स गोळी लागून ठार झाला. दोन आरोपींवर संशय होता; मात्र ते निर्दोष ठरले.
२०१३ – लेस रॅसिन द व्ही मॉन्टेसरी, गॅटिनो, क्युबेक
डे-केअरमध्ये दोन प्रौढांचा मृत्यू झाला. आरोपी रॉबर्ट चॅरॉनने लगेच आत्महत्या केली. ५३ मुलांना कर्मचाऱ्यांनी सुरक्षित बाहेर काढले.
२०१५ – ला लोचे कम्युनिटी स्कूल, सास्कॅचेवान
१७ वर्षांच्या विद्यार्थ्याने आधी घरात दोन भावंडांची हत्या केली आणि नंतर शाळेत हल्ला केला. शिक्षक आणि शिक्षणसहाय्यक ठार; ७ जखमी. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
२०२६ – टम्बलर रिज सेकंडरी स्कूल, ब्रिटिश कोलंबिया
फेब्रुवारी २०२६ मध्ये सेकंडरी शाळेत गोळीबार झाला. ९ जणांचा मृत्यू, २५ जखमी. पोलिसांनी “अॅक्टिव शूटर” परिस्थिती जाहीर करत परिसरात ‘शेल्टर-इन-प्लेस’ आदेश दिले.
<!-- Inject Script Filtered -->