MLA Rohit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात याची निःपक्ष चौकशी व्हावी - आमदार रोहित पवार
10-Feb-2026
Total Views |
मुंबई : (MLA Rohit Pawar) "उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघात की घातपात झाला आहे याची निःपक्ष चौकशी व्हावी. मला यात राजकारण करायचे नाही पण सगळ्या घटना पाहता संशयाला वाव आहे."असे प्रतिपादन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी मंगळवार दि.१० रोजी केले.(MLA Rohit Pawar)
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पी पी टी द्वारे एक तास प्रेझेंटेशन दिले. ज्यात त्यांनी विमान कंपनी पासून ते पायलट, आणि इतर गोष्टींबाबत काय काय गोष्टी संशयास्पद वाटतात ते स्पष्ट केले. सरकार आपले काम करत आहे पण पुतण्या आणि जवळचा म्हणून मला याबाबत बोलावेच लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.(MLA Rohit Pawar)