Chandrashekhar Bawankule : कळमेश्वरमध्ये 'कोल टू केमिकल' प्रकल्पाचा मार्ग मोकळा!

10 Feb 2026 17:13:57
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) नागपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले असून कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे प्रस्तावित असलेल्या 'कोल टू केमिकल' प्रकल्पासाठी ११७ हेक्टर १९ आर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या पाठपुराव्यामुळे हा महत्वकांक्षी प्रकल्प तडीस जाणार आहे.(Chandrashekhar Bawankule)
 
हा प्रकल्प विदर्भातील रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून ,पालकमंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या जमिनीच्या हस्तांतरणातील तांत्रिक पेच सोडवण्यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या पुढाकारामुळे महसूल विभागाने या जमिनीचे वाटप तातडीने मंजूर केले असून, यामुळे आता या भव्य प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष जमिनीवर सुरू होणार आहे.(Chandrashekhar Bawankule)
 
हेही वाचा : Chandrasekhar Bawankule : 'मविआ'ने नकारात्मकता सोडून आत्मपरीक्षण करावे 
 
सुमारे २९० एकर जमीन उपलब्ध होणार असून कोळशापासून रसायने तयार करण्याचा हा प्रकल्प पर्यावरणाचे निकष पाळून कार्यान्वित केला जाईल. कळमेश्वर, काटोल आणि नागपूर परिसरातील हजारो तरुणांना या प्रकल्पामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.(Chandrashekhar Bawankule)
 
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नागपूर जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आमचे औद्योगिक क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य आहे. हा निर्णय इथल्या ३० हजाराहून अधिक तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारा आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर होईल.(Chandrashekhar Bawankule)
 चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री
 
 
Powered By Sangraha 9.0