Soham Katre : बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला

डोंबिवलीतील सोहम कटरेचा रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू

    10-Feb-2026
Total Views |
Soham Katre
 
ठाणे : (Soham Katre) बारावीच्या पहिल्या पेपरसाठी घरातून निघालेल्या सोहम सचिन कठरे (Soham Katre) वय - १८ वर्ष याचा लोकल रेल्वेमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन सोहम (Soham Katre) खाली पडला त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिस ठाणे यांनी दिली आहे. सोहम डोंबिवली येथे राहत होता आणि कळव्यातील मनिषा विद्यालय येथे त्याचे परीक्षा केंद्र होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.(Soham Katre)