Rahul Gandhi : राहुल गांधींच्या हातातील ‘पुस्तक’च बेकायदेशीर!

10 Feb 2026 18:13:41
Rahul Gandhi
 
मुंबई : (Rahul Gandhi) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत दाखवलेले माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. हे स्पष्टपणे पुस्तकाची प्रकाशन कंपनी ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ यांनी अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी एफआयआरही दाखल केली आहे.(Rahul Gandhi)
 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाशकांनी हेही स्पष्ट केले की, केवळ पुस्तकच नव्हे, तर आतापर्यंत पुस्तकाची कोणतीही प्रत सार्वजनिक करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर जी कोणतीही प्रत किंवा मजकूर व्हायरल होत आहे, तो पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे प्रकाशकांनी सांगितले. सोशल मीडियावर पुस्तकातील काही अंश फिरत असल्यामुळे त्यांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर हे स्पष्टीकरण समोर आले. याच मुद्द्यावरून गेल्या आठवड्यात संसदेत मोठा गदारोळही झाला होता.
 
हेही वाचा : Maithili Thakur : रुग्णालय की मृत्यूचा सापळा? बिहार विधानसभेत आरोग्यमंत्र्यांनाच भिडल्या आमदार मैथिली ठाकूर  
 
‘पेंग्विन’ प्रकाशन संस्थेने निवेदन जारी करत सांगितले की, “अलीकडे या पुस्तकासंदर्भात सार्वजनिक चर्चा आणि माध्यमांमध्ये बातम्या समोर आल्या आहेत. यासंदर्भात पेंग्विन रँडम हाऊस इंडिया हे स्पष्ट करू इच्छिते की ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार केवळ पेंग्विन रँडम हाऊस इंडिया यांच्याकडेच आहेत. आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. पेंग्विन रँडम हाऊस इंडिया कडून या पुस्तकाची कोणतीही प्रत आतापर्यंत छापण्यात आलेली नाही. त्यामुळे ती वितरीत केलेली नाही किंवा कोणत्याही स्वरूपात सार्वजनिक केलेली नाही.
 
पुढे प्रकाशकांनी असे म्हटले की, जर या पुस्तकाची कोणतीही प्रत कोणत्याही स्वरूपात उपलब्ध असेल, तर ती पेंग्विन रँडम हाऊस इंडिया यांच्या कॉपीराइटचा भंग ठरेल. पेंग्विन रँडम हाऊस इंडिया या पुस्तकाच्या बेकायदेशीर आणि अनधिकृत प्रसाराविरोधात कायद्यांतर्गत उपलब्ध असलेले सर्व कायदेशीर उपाय अवलंबेल.
 
 
Powered By Sangraha 9.0