Chandrasekhar Bawankule : 'मविआ'ने नकारात्मकता सोडून आत्मपरीक्षण करावे

जिल्हा परिषद निकालावरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला - विकासाला आणि ‘डबल इंजिन’ सरकारला पसंती

    10-Feb-2026
Total Views |
Chandrasekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrasekhar Bawankule) राज्यातील जनतेने नकारात्मक राजकारणाला नाकारून महायुतीच्या विकासाला कौल दिला आहे. महाविकास आघाडीचे नेते केवळ टिकेच्या आधारावर मते मागत आहेत, त्यांनी आता तरी नकारात्मकता सोडून आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत महसूल मंत्री आणि नागपूर व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
 
विकासाला आणि ‘डबल इंजिन’ सरकारला पसंती
 
जिल्हा परिषद निवडणुकीतील यशाबद्दल बोलताना बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले की, हे यश विकासाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना कशा प्रभावी ठरू शकतात, याचा विश्वास जनतेला दिला. 'डबल इंजिन' सरकार आणि ४८ टक्के जिल्हा नियोजन विकास निधी (डीपीडीसी) निधीच्या माध्यमातून होणाऱ्या कामांमुळेच जनतेने भाजपला मतदान केले आहे.(Chandrasekhar Bawankule)
 
हेही वाचा : Maithili Thakur : रुग्णालय की मृत्यूचा सापळा? बिहार विधानसभेत आरोग्यमंत्र्यांनाच भिडल्या आमदार मैथिली ठाकुर 
 
काँग्रेसचा ‘नकारात्मक फॉर्म्युला’
 
महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की, विरोधकांनी निव्वळ नकारात्मकतेचा मार्ग निवडला आहे, जो जनतेला रुचलेला नाही. भाजपचा पराभव झाला तर आमचा कार्यकर्ता आत्मचिंतन करून पुन्हा कामाला लागतो, मात्र काँग्रेसकडे केवळ टीका करण्याचाच फॉर्म्युला आहे. जनतेचा कल आता पूर्णपणे विकासाकडे आहे.(Chandrasekhar Bawankule)
 
मुंबईतील 'मविआ'च्या बैठकीवर टिप्पणी
 
मुंबईत सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत बावनकुळे म्हणाले, "पराभवानंतर आत्मपरीक्षण करणे गरजेचे असते, पण काँग्रेस आता जनतेच्या मूळ मुद्द्यांपासून दूर गेली आहे. लोकांनी नाकारलेले मुद्दे घेऊन ते राजकारण करत आहेत. त्यांनी आपला अजेंडा विकासावर सेट केला तर त्यांच्यासाठी ते जास्त चांगले ठरेल."(Chandrasekhar Bawankule)
 
देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा विकासकामांसाठीच
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत स्पष्टीकरण देताना बावनकुळे यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री राजकीय चर्चेसाठीच दिल्लीला जातात असे नाही. राज्याचा आगामी अर्थसंकल्प आणि केंद्राकडून मिळणारी मदत या विषयावर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्यसभेवर गेल्यानंतर सदिच्छा भेट म्हणूनही हा दौरा असू शकतो. असेही बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले.