भुवनेश्वर: (KIIT 2025) KIIT Deemed to be University (KIIT-DU) ने 2025 बॅचसाठी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत देशातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये आपले स्थान पुन्हा अधोरेखित केले आहे. जागतिक स्तरावर रोजगारबाजार आव्हानात्मक असतानाही KIIT ने सुमारे 92.5 टक्के एकूण प्लेसमेंट कन्वर्जन नोंदवले आहे. (KIIT 2025)
2025 च्या प्लेसमेंट हंगामात 757 हून अधिक कंपन्या KIIT कॅम्पसवर आल्या. सुमारे 5,000 पात्र विद्यार्थ्यांमधून 4,621 नोकरीच्या ऑफर्स विविध शाळा आणि शाखांमध्ये देण्यात आल्या. KIIT School of Technology ने या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये आघाडी घेतली. 451 कंपन्यांनी 3,800 पेक्षा अधिक ऑफर्स दिल्या असून सरासरी पॅकेज 8.5 लाख रुपये प्रतिवर्ष इतके राहिले. 739 विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक ऑफर्स मिळाल्या, तर 1,500 हून अधिक ऑफर्स ‘ड्रीम ऑफर्स’ म्हणून नोंदवण्यात आल्या. 59 कंपन्यांनी 10 लाख रुपये प्रतिवर्ष किंवा त्याहून अधिक पॅकेज दिले. (KIIT 2025)
या हंगामातील सर्वाधिक पॅकेज 51 लाख रुपये प्रतिवर्ष Microsoft कडून देण्यात आले. TCS आणि Wipro यांसारख्या मास रिक्रुटर्सनी मोठ्या संख्येने भरती केली. याशिवाय 1,209 पेड इंटर्नशिप संधीही उपलब्ध झाल्या. (KIIT 2025)
2025 च्या प्लेसमेंटमध्ये NVIDIA चा सहभाग विशेष ठरला. NVIDIA ने 36.28 लाख रुपये प्रतिवर्ष पॅकेज ऑफर केले, ज्यामुळे KIIT च्या विद्यार्थ्यांवरील जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचा वाढता विश्वास दिसून आला. Human Resocia, Hike आणि PayPal या कंपन्यांनीही 30 लाख रुपयांपेक्षा जास्त पॅकेज देऊ केले. (KIIT 2025)
इतर शाळांमध्येही समाधानकारक प्लेसमेंट झाले. KIIT School of Management मध्ये 161 कंपन्यांनी सहभाग घेत 401 ऑफर्स दिल्या असून सर्वाधिक पॅकेज 20 लाख रुपये प्रतिवर्ष होते. KIIT School of Rural Management ने 100 टक्के प्लेसमेंट साध्य केले, तर KIIT School of Biotechnology मध्ये 85 टक्के प्लेसमेंट झाले. KIIT School of Law मध्ये नामांकित कायदा फर्म्स आणि कॉर्पोरेट संस्थांनी भरती केली असून सर्वाधिक पॅकेज 9.6 लाख रुपये प्रतिवर्ष इतके होते. (KIIT 2025)
दरम्यान, 2026 बॅचसाठीच्या प्लेसमेंट प्रक्रियेलाही चांगली सुरुवात झाली आहे. सध्या हंगाम मध्यावर असतानाच एकूण सुमारे 70 टक्के प्लेसमेंट कन्वर्जन झाले आहे. KIIT School of Technology मध्ये 175 पेक्षा अधिक कंपन्यांनी आतापर्यंत 3,000 हून अधिक ऑफर्स दिल्या आहेत. (KIIT 2025)
KIIT आणि KISS चे संस्थापक Achyuta Samanta यांनी सांगितले की, KIIT मध्ये विद्यार्थ्यांना केवळ पहिल्या नोकरीसाठी नव्हे तर दीर्घकालीन आणि शाश्वत करिअरसाठी तयार करण्यावर भर दिला जातो. जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांचा KIIT वर असलेला विश्वास हा शिक्षणाच्या गुणवत्तेचा आणि उद्योगाशी असलेल्या मजबूत संबंधांचा पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले. (KIIT 2025)