मुंबई : (Rupali Patil Thombre) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान अपघाताबाबत आता संशय आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत, या अपघातामागे केवळ अपघात नसून घातपात आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Rupali Patil Thombre)
रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी आणि अपघाताच्या दिवशी अनेक संशयास्पद घडामोडी घडल्या. “अजित पवार सकाळी ८ वाजता ज्या विमानाने प्रवास करणार होते, त्या विमानाचे पायलट आणि को-पायलट ऐनवेळी बदलण्यात आले. दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकले होते, असं सांगितलं गेलं. मात्र अशा महत्त्वाच्या व्यक्तीच्या प्रवासात शेवटच्या क्षणी पायलट बदलण्याचं कारण काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Rupali Patil Thombre)
सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय?
मा.अजित दादांच्या अचानक जाण्याने बधिर झालो,
कसे झाले का झाले काहीच कळत नाही.
देवाने लाखोच्या पोशिंदा नव्हता न्यायचा आमच्या सारखे नेहयचे होते अत्यंत अघटीत घडले.आता जे घडले त्याचे सत्य संपूर्ण तपशील,पारदर्शक चौकशी जगासमोर येणे तितकेच महत्वपूर्ण आहे.
राहून राहून मनात हे प्रश्न येतात त्याची उतरे मिळाली पाहिजेत.
फ्लाइट 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्राफिकमध्ये अडकल्याचा दावा, दोघांचा एकाच वेळी उशीर, अचानक पायलट बदल आणि त्यानंतरची सेफ्टी प्रक्रिया—या सर्व बाबींची सविस्तर व पारदर्शक माहिती सार्वजनिक का नाही?
याची चौकशी होणे गरजेचे कारण घात की अपघात?