राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दलच्या नियुक्तीच्या वृत्तावर पटेल यांनी दिले स्पष्टीकरण!

01 Feb 2026 12:25:51


 
Praful Patel
 
मुंबई : (Praful Patel) उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल झाल्याच्या चर्चा सुरू असतानाच, या विषयावर आता प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेली नाही.” (Praful Patel)


हेही वाचा :  उबाठाच्या घराणेशाहीचा शेवटचा बुरुज ढासळला!

 
अजित पवार हयात असतात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तर प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीवर तोडगा काढण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी तातडीने प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. (Praful Patel)

<!-- Inject Script Filtered -->
दरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एका मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट केली. “अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र सध्याच्या परिस्थितीत विलिनीकरण शक्य नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्वतंत्रपणे वाटचाल करेल, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं. (Praful Patel)
 

 

Powered By Sangraha 9.0