Nirmala Sitharaman on Budget 2026 : कोकणासाठी बजेटमध्ये महत्वाची घोषणा

    01-Feb-2026
Total Views |
 
Nirmala Sitharaman on Budget 2026
 
नवी दिल्ली : (Nirmala Sitharaman on Budget 2026) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात कोकण किणारपट्टी भागासाठी महत्वाची घोषणा केली. आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. इलेक्ट्रोनिक्स, लघू उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कोकणातील नारळ आणि काजू उत्पादनातील वाढीसाठीही केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची घोषणा त्यांनी अर्थसंकल्पात केली. (Nirmala Sitharaman on Budget 2026)
 
हेही वाचा :  Budget Breaking: अर्थसंकल्प २०२६-२७ : सरकारी संस्थांना मिळणार ‘या’ प्रोत्साहनांचा लाभ
 
निर्मला सितारामण म्हणाल्या, “भारताला २०३० पर्यंत काजू आणि नारळ उत्पादन प्रक्रियेत स्वावलंबी बनविण्यासाठी, निर्यात स्पर्धा वाढविण्यासाठी, भारतीय काजू आणि कोकोला ब्रँण्ड बनविण्यासाठी एक विशेष कार्यक्रम सरकार हाती घेत आहे.” नारळ व काजू उत्पादनावर प्रामुख्याने अवलंबून असणाऱ्या कोकण किनारपट्टी भागातील उत्पन्न वाढण्याची यामुळे शक्यता व्यक्त केली जात आहे. (Nirmala Sitharaman on Budget 2026)