मुंबई : (Devendra Fadnavis) अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू झालेल्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतील का? असा थेट सवाल करत फडणवीसांनी विलिनीकरणाच्या दाव्यांवर शंका उपस्थित केली. (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री म्हणाले की, “जर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली असती आणि त्याची तारीख ठरली असती, तर ती आम्हाला नक्कीच सांगण्यात आली असती. अशा कोणत्याही तारखेची किंवा निर्णयाची माहिती आम्हाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने असा कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी.” (Devendra Fadnavis)
हेही वाचा : Devendra Fadnavis: विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, शरद पवार गटाकडून असा दावा करण्यात येत आहे की अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करण्यासाठी आग्रही होते आणि १२ फेब्रुवारी रोजी त्याची अधिकृत घोषणा होणार होती. या दाव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “समजा अजित पवार विलिनीकरणाचा निर्णय घेत असतील, तर ते भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? मी स्वतः अजित पवारांसोबत दोन तास चर्चा केली होती. मात्र त्यांनी अशा कोणत्याही निर्णयाची किंवा तारखेची माहिती मला दिली नव्हती.” (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “अजित पवार यांच्या पक्षाने जो निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी नेतृत्व करावं हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयासोबत उभं राहणं हे आमचं काम आहे.” (Devendra Fadnavis)