नागपूर : (Chandrashekhar Bawankule) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा आणि भविष्योन्मुख असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Chandrashekhar Bawankule)
रेल्वे, रस्ते, उद्योग, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदींमुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळणार असल्याचे सांगून ते म्हणाले, राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आलेला २३,७७८ कोटींचा विक्रमी निधी, मुंबई–पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, तसेच अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत १३२ स्थानकांचा पुनर्विकास हे राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. (Chandrashekhar Bawankule)
हेही वाचा : Budget 2026 : पैसा कुठून येतो आणि कुठे खर्च होतो? जाणून घ्या सविस्तर
राष्ट्रीय महामार्ग, सागरी महामार्ग आणि कोकणातील कनेक्टिव्हिटीसाठी केलेली तरतूद तसेच पुणे येथील सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर आणि पालघर बंदर प्रकल्पामुळे राज्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळून रोजगारनिर्मिती वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Chandrashekhar Bawankule)
कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेले विशेष पॅकेज, सिंचन प्रकल्पांसाठी दिलेला निधी आणि महिला सक्षमीकरणासाठी ‘लखपती दीदी’ योजनेतून करण्यात आलेली तरतूद ही शेतकरी व महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. (Chandrashekhar Bawankule)
हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर, समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि .केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे बावनकुळे यांनी आभार मानले. (Chandrashekhar Bawankule)