Budget Breaking: अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी दोन योजना : जाणून घ्या सविस्तर माहिती

01 Feb 2026 14:09:10
 
Budget Breaking
 
नवी दिल्ली : (Budget Breaking) केंद्रीय अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२०२७ सादर करताना केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ‘सबका साथ, सबका विकास’ ही आमची दृष्टी असून, प्रत्येक कुटुंब, समुदाय, प्रदेश आणि क्षेत्राला अर्थपूर्ण सहभागासाठी आवश्यक साधनसंपत्ती, सुविधा आणि संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. (Budget Breaking)
 
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी दिव्यांगजनांसाठी दोन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. दिव्यांग कौशल्य योजना आणि दिव्यांग सहारा योजना, अशा या घोषणा आहेत. (Budget Breaking)
 
हेही वाचा :  Budget Breaking: कर्तव्य भवनातील पहिल्याच अर्थसंकल्पात तीन कर्तव्यांचा सामावेश! काय आहेत ही तीन कर्तव्ये?
 
दिव्यांग कौशल्य योजना:
 
माहिती तंत्रज्ञीन, एव्हीजीसी (अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स), आतिथ्य तसेच अन्न व पेय क्षेत्रांमध्ये दिव्यांगजनांसाठी अनुकूल कार्याभिमुख आणि प्रक्रिया-केंद्रित भूमिका उपलब्ध आहेत. या योजने अंतर्गत प्रत्येक दिव्यांग गटाच्या गरजेनुसार उद्योग-सुसंगत व अनुकूल प्रशिक्षण देऊन उपजीविकेच्या सन्माननीय संधी उपलब्ध करून दिल्या जातील. (Budget Breaking)
 
दिव्यांग सहारा योजना:
 
सर्व पात्र दिव्यांगजनांना उच्च दर्जाची सहाय्यक उपकरणे वेळेवर उपलब्ध होणे ही मूलभूत गरज आहे. या अर्थसंकल्पात (i) सहाय्यक उपकरणांच्या उत्पादनात वाढ, संशोधन व विकास तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता एकात्मिकरणासाठी भारताचे कृत्रिम अवयव उत्पादक महामंडळ – ‘एएलआयएमसीओ’ला पाठबळ देणे, (ii) प्रधान मंत्री दिव्याशा केंद्रांचे बळकटीकरण आणि दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उत्पादने वापरून पाहून खरेदी करता येतील अशी आधुनिक किरकोळ प्रकारची‘सहाय्यक तंत्रज्ञान केंद्र’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. (Budget Breaking)
 
 
Powered By Sangraha 9.0