Budget 2026 : पैसा कुठून येतो आणि कुठे खर्च होतो? जाणून घ्या सविस्तर

01 Feb 2026 18:20:33

Budget 2026 
 
नवी दिल्ली : (Budget 2026) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर केला. याचा एकूण खर्च ५५.५ लाख कोटी इतका असून भांडवली खर्च हा २६.१ लाख कोटी इतका आहे. यातून सरकारचा भर हा खर्चावर नसून गुंतवणूकीवर असल्याचे स्पष्ट दिसते. धोरणात्मक व फ्रंटीअर क्षेत्रातील उत्पन्नवाढ, पारंपारिक उद्योगांचे पुर्नरज्जीवन, पायाभूत सुविधांना मोठी चालना अशी प्रमुख वैशिष्ट्ये या अर्थसंकल्पाची दिसत आहेत. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारला मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाचा उगम आणि तो खर्च कुठे होतो, याचे स्पष्ट चित्र केंद्र सरकराने जाहीर केले आहे. करसंकलन, कर्जउभारणीपासून ते राज्यांना वाटा, व्याजफेड आणि संरक्षण खर्चापर्यंत संपूर्ण आर्थिक चक्र या आकडेवारीतून दिसून येते. (Budget 2026)
 
हेही वाचा :  अर्थसंकल्प २०२६-२७ : सकल राष्ट्रीय उत्पन्नात ७.४ टक्क्यांनी दरवाढ
 
पैसा कुठून येतो? (Rupee Comes From)
 
सरकारकडे येणाऱ्या प्रत्येक रुपयामागे खालील प्रमुख स्रोत आहेत —
 
कर्ज व दायित्वे (Borrowings & Liabilities) – 24%
 
➝ सरकारकडून उभारले जाणारे कर्ज हा सर्वात मोठा स्रोत
 
आयकर (Income Tax) – 21%
 
➝ वैयक्तिक आणि पगारदार करदात्यांचा मोठा वाटा
 
कॉर्पोरेट कर (Corporation Tax) – 18%
 
➝ कंपन्यांकडून आकारला जाणारा कर
 
GST व इतर कर – 15%
 
करविरहित महसूल (Non-Tax Revenue) – 10%
 
➝ लाभांश, शुल्क, व्याज उत्पन्न
 
केंद्रीय उत्पादन शुल्क (Union Excise Duties) – 6%
 
सीमाशुल्क (Customs) – 4%
 
गैर-ऋण भांडवली प्राप्ती – 2% 
 
पैसा कुठे खर्च होतो? (Rupee Goes To)
 
सरकारकडील प्रत्येक रुपया पुढीलप्रमाणे खर्च केला जातो —
 
राज्यांचा करांतील वाटा – 22%
 
➝ केंद्र सरकार राज्यांना मोठा हिस्सा देते
 
 
व्याज देयके (Interest Payment) – 20%
 
➝ आधी घेतलेल्या कर्जावर व्याजफेड
 
केंद्रीय क्षेत्र योजना (Central Sector Schemes) – 17%
 
संरक्षण (Defence) – 11%
 
केंद्रपुरस्कृत योजना – 8%
 
वित्त आयोग व इतर हस्तांतरणे – 7%
 
इतर खर्च – 7%
 
मुख्य अनुदाने (Major Subsidies) – 6%
 
नागरी पेन्शन (Civil Pension) – 2%
 
Powered By Sangraha 9.0