Budget 2026-27: करदात्यांना दिलासा नाही, पण उद्योग आणि विकासाला मोठा हातभार! काय स्वस्त, काय महाग?

01 Feb 2026 16:29:27
 
Budget 2026-27
 
नवी दिल्ली : (Budget 2026-27) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं असलं, तरी देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि विविध उद्योग क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफमुळे जागतिक व्यापारात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताची आर्थिक घडी मजबूत ठेवण्यावर सरकारने भर दिला आहे. (Budget 2026-27)
 
अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, वित्तीय तूट जीडीपीच्या ४.५ टक्क्यांपेक्षा कमी राहील. चालू आर्थिक वर्षात ती ४.४ टक्के असून, २०२६-२७ मध्ये ती ४.३ टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे सरकारची वित्तीय शिस्त कायम असल्याचं चित्र समोर येत आहे. (Budget 2026-27)
 
हेही वाचा :  Nirmala Sitharaman on Budget 2026: बँकींग क्षेत्रातील धोरणांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन होणार
 
१. काय स्वस्त होणार?
 
कॅन्सरसाठीच्या १७ औषधांवरचं आयात शुल्क कमी करण्यात आल आहे, ७ गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरील औषधांवरील आयात शुल्क घटवण्यात आले आहे.
 
परदेशी टूर पॅकेजेसवरील टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स - TCS दर ५-२० टक्के होता. तो घटवून २ टक्के केला जाईल.
 
परदेशी शिक्षणावरील TCS मध्ये घट करून ५ टक्क्यांवरून २ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.
 
याशिवाय वैद्यकीय उपकरणं, क्रीडा साहित्य, मोबाईल फोन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन, लिथियम आयन बॅटरी, सौर पॅनल्स, EV वाहनं आणि बॅटरी, CNG, बायोगॅस स्वस्त होईल.
 
२. काय महागणार?
 
लक्झरी घड्याळं
 
इम्पोर्टेड दारू
 
सिगरेट - विडी - पान मसाला, गुटखा
 
अमोनियम फॉस्फेट - अमोनियम नायट्रो-फॉस्फेट असणारी काही खतं
 
फिल्म्ससाठीचा इम्पोर्टेड कॅमेरा
Powered By Sangraha 9.0