आमच्या नेत्यांनीच आमचा राजकीय बळी दिला - संतोष नलावडे

09 Jan 2026 12:11:46
 Santosh Nalawade
 
मुंबई : ( Santosh Nalawade ) "आमच्या नेत्यांनीच आमचा राजकीय बळी दिला. राज ठाकरेंनी जो पक्ष वटवृक्षप्रमाणे फुलवला.तो वटवृक्ष काही नेते आपल्या स्वार्थासाठी छाटत आहेत.या वृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचे काम सुरू आहे." असे आरोप करीत मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे कट्टर समर्थक आणि मनसे शिवडी विभाग अध्यक्ष असलेल्या संतोष नलावडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.हा शिवडी मध्ये मनसेला धक्का मानला जातो. त्यांनी आपल्या पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.
 
पत्राद्वारे संतोष नलावडे यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.ज्यात उबाठा ने मनसेला डावल्याचा प्रयत्न जागा वाटपात केला असून राज ठाकरेंनी आपला पक्ष उद्धव ठाकरेंना सोपवला का असा प्रश्न उपस्थित केलेल्या संतोष धुरी प्रमाणेच ही भूमिका नलावडे यांनी आता घेतली आहे.तसेच पक्षातील वरिष्ठ कार्यपध्दती व दुर्लक्षावर भाष्य केले आहे.गेली २० वर्षे ज्यानी आंदोलने केली , तुरुंगवास भोगला त्यांना निवडणूक काळात वाऱ्यावर सोडले जात आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक २०२,२०३,२०४,२०६ याबाबत ही नाराजी असल्याचे मानले जाते.
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : अहिल्यानगरचा सर्वांगीण विकास करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
'मला अभिमन्यू न होता, चक्रव्यूह भेदणारा योद्धा व्हायचे आहे. आमच्या नेत्यांनी जागा वाटपात पूर्णपणे हाराकिरी केली.'असेही नलावडे यांनी म्हटले आहे. शिवडी, माहीम, वरळी या मराठी बहुल भागात मनसेला जागा वाटप करण्यात उबाठा ने डावललेले पहायला मिळाले.त्याची नाराजी या प्रकारातून व्यक्त झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0