मुंबई : ( Nilesh Rane ) " तिकिटासाठी किशोरी पेडणेकर यांनी उद्धव ठाकरेंना धमकी दिली होती. तसेच किशोरी पेडणेकर यांनी प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवली गेली आहे." असा आरोप शिवसेना नेते आणि आमदार निलेश राणे यांनी किशोर पेडणेकर यांच्यावर शुक्रवार दि.९ रोजी केला आहे.
"दोन क्रिमिनल एफ आय आर किशोरी पेडणेकर यांच्यावर दाखल होऊन सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख निवडणूक अर्जात केलेला नाही आहे.याबाबत आपण कायदेशीर तक्रार देखील केलेली आहे.या प्रकरणाचा पाठलाग आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत करणार आहोत. अर्ज प्रक्रियेत किशोरी पेडणेकर या अपात्र होणार आहेत ही काळया दगडावरची रेघ आहे.उमेदवारी मिळत न्हवती तेव्हा उद्धव ठाकरे आणि ठाकरे वहिनींना धमकी देऊन त्यांनी उमेदवारी मिळवली आहे.सुखासुखी त्यांना उमेदवारी मिळालेली नाही आहे." असेही राणे म्हणाले.
हेही वाचा : मराठी म्हणून छाती बडविणाऱ्या ठाकरेंनी पागडी मधील मराठी लोकांसाठी काय केले - आमदार चित्रा वाघ
"मी सगळच बाहेर काढीन , कोविड काळात सगळ मला माहित आहे."अशी धमकी देऊन त्यांनी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी मिळवली आहे.आणि आता त्यांच भांड फुटलं आहे.असेही प्रतिपादन निलेश राणे यांनी केले.