PM Narendra Modi : 'मेड इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड'; भारताला जागतिक एआय नेतृत्व बनवण्यासाठी मोदींचा मूलमंत्र

    08-Jan-2026   
Total Views |

PM Narendra Modi

नवी दिल्ली : (PM Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ८ जानेवारीला भारतीय एआय स्टार्टअप्सची गोलमेज बैठक पार पडली. पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ (India AI Impact Summit 2026) च्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी, समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व अधोरेखित केले. 

या बैठकीत AI for All: Global Impact Challenge साठी पात्र ठरलेल्या १२ भारतीय एआय स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. या १२ भारतीय एआय स्टार्टअप्सनी आरोग्यसेवा, बहुभाषिक एलएलएम, मटेरियल संशोधन, डेटा विश्लेषण, इंजिनिअरिंग सिम्युलेशन अशा विविध क्षेत्रांतील आपले कार्य आणि नाविन्यपूर्ण उपाय सादर केले.

पंतप्रधान म्हणाले की, स्टार्टअप्स आणि एआय उद्योजक हे भारताच्या भविष्याचे सह-शिल्पकार आहेत. भारताकडे नाविन्यपूर्ण कल्पना आणि मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणीची प्रचंड क्षमता आहे. 'मेड इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड' या भावनेतून तयार झालेले एआय मॉडेल जगासमोर मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. २०२६ला होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट द्वारे भारत तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाची जागतिक भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला अवतार, भारतजेन, फ्रॅक्टल, गॅन, जेनलूप, ज्ञानी, इंटेलिहेल्थ, सर्वम, शोध एआय, सोकेट एआय, टेक महिंद्रा आणि झेंटेइक या स्टार्टअप्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनीही बैठकीस उपस्थिती लावली.



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\