छत्रपती संभाजीनगर : (Imtiaz Jalil) महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा जोर वाढत असतानाच, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर त्यांच्याच पक्षातील संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. आगामी महापालिका निवडणुकांसाठी तिकीट वाटपात डावलण्यात आल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Imtiaz Jalil)
हेही वाचा : Palika Election 2026: अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसच्या निलंबित १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश
इम्तियाज जलील यांची प्रचार रॅली बायजीपुरा भागातून जात असताना अचानक काही संतप्त कार्यकर्त्यांनी गाडी अडवून घेराव घातला. यावेळी जोरदार गोंधळ झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या आरोपींच्या यादीत काँग्रेसचे उमेदवार हबीब कुरेशी आणि कलीम कुरेशी यांचाही समावेश असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. (Imtiaz Jalil)
दरम्यान, या घटनेनंतर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची बायजीपुरा भागात पायी रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य तणाव लक्षात घेता परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. या घटनेमुळे एमआयएममधील अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला असून, निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी ही गंभीर डोकेदुखी ठरत आहे. (Imtiaz Jalil)