मुंबई : (Palika Election 2026) महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा जोर वाढत असतानाच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. या घडामोडींचा केंद्रबिंदू मुंबई नव्हे, तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ ठरला आहे. अंबरनाथ महापालिकेतील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांच्या संपूर्ण गटाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Palika Election 2026)
अंबरनाथमध्ये भाजप-राष्ट्रवादीसोबत काँग्रेसच्या नगरसेवकांनी युती केल्याने आधीच वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संबंधित १२ नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र या कारवाईनंतर अवघ्याच काही काळात या सर्व नगरसेवकांनी थेट भाजपची वाट धरली आहे. (Palika Election 2026)
हेही वाचा : Devendra Fadnavis:‘स्वतःला ब्रँड म्हणणाऱ्यांचा बँड वाजवू’; ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीआधी फडणवीसांचा निशाणा
हा पक्षप्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रावर काम करत आहे. सत्तेत राहिल्यास नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवता येतात आणि त्यांना न्याय देता येतो.” (Palika Election 2026)
या घडामोडीमुळे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता असून, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससाठी ही मोठी राजकीय पीछेहाट मानली जात आहे. (Palika Election 2026)