CM Devendra Fadnavis : अहिल्यानगरचा सर्वांगीण विकास करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

08 Jan 2026 21:39:22

CM Devendra Fadnavis

मुंबई : (CM Devendra Fadnavis)
महापालिका निवडणुकीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी अहिल्यानगर येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच अहिल्यानगरचा महापौर होणार असल्याचे सांगत, या शहराला केवळ नवे नाव देऊन आम्ही थांबणार नाही, तर अहिल्यादेवींप्रमाणे शहराचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अहिल्यानगरसाठी ४९२ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असून निवडणुकीनंतर लगेच त्याला मान्यता दिली जाईल. तसेच भुयारी गटार योजना आणि शहर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल", असेही त्यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगरमध्ये लवकरच संरक्षण मार्गिका (Defence Corridor) उभारली जाणार असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या प्रचारसभेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0