मुंबई : (Thackeray brothers) मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बोलू नये,” असे स्पष्ट विधान राज ठाकरे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Thackeray brothers)
हेही वाचा : Prithviraj Chavan :“ट्रम्प भारतीय पंतप्रधानांचे अपहरण करतील का?”; पृथ्वीराज चव्हाण यांचे पुन्हा वादग्रस्त विधान
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर नुकताच समोर आला असून, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात, “आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीत,” या वक्तव्यामुळे स्थानिक विरुद्ध बाहेरील हा जुना वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच, “महाराष्ट्राला २० वर्षे वाट का पाहावी लागली?” असा सवालही या टीझरमधून उपस्थित करण्यात आला आहे. (Thackeray brothers)