मुंबई : (Prithviraj Chavan) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका विधानामुळे राज्याच्या राजकारणात तीव्र वाद निर्माण झाला आहे. भारत-अमेरिका व्यापार संबंध आणि अमेरिकेने लादलेल्या उच्च शुल्काच्या पार्श्वभूमीवर बोलताना चव्हाण यांनी व्हेनेझुएलातील घटनांचा संदर्भ देत ट्रम्प मोदींचेही अपहरण करणार का? असे वादग्रस्त विधान केले आहे. (Prithviraj Chavan)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त शुल्क लादल्याचा उल्लेख करताना चव्हाण म्हणाले की, “ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के अतिरिक्त शुल्क लादले तरी फारसा फरक पडणार नाही.” यानंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “व्हेनेझुएलामध्ये जे घडलं, तसं भारतातही घडेल का? ट्रम्प भविष्यात भारतीय पंतप्रधानांचं अपहरण करतील का?” (Prithviraj Chavan)
या विधानानंतर भाजपने चव्हाण यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्सवर चव्हाण यांच्या मुलाखतीची क्लिप शेअर करत काँग्रेसवर भारतविरोधी मानसिकतेचा आरोप करत, भंडारी यांनी म्हटले की, “काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण बेशर्मीने भारताची तुलना व्हेनेझुएलाशी करत आहेत. ‘जे व्हेनेझुएलामध्ये झाले ते भारतात होईल का?’ असा प्रश्न विचारून काँग्रेसची भारतविरोधी मानसिकता स्पष्ट होते.” (Prithviraj Chavan)
उल्लेखनीय म्हणजे, याआधीही ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्या नव्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Prithviraj Chavan)