Imtiaz Jalil : संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न; एमआयएममधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर, नेमकं प्रकरण काय?

07 Jan 2026 15:49:11
 
Imtiaz Jalil
 
संभाजीनगर: (Imtiaz Jalil) महापालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दोन शिवसेना गट, भाजप, एमआयएम तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील लढत अधिकच तीव्र होत असतानाच, प्रचारादरम्यान एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. (Imtiaz Jalil)
 
प्रचार रॅलीदरम्यान बायजीपुरा–जिन्सी परिसरात काही संतप्त एमआयएम कार्यकर्त्यांनी जलील यांच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवत विरोध केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीचार्ज केला. या गोंधळात जलील यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली असून, एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती माध्यमांवरून समोर येत आहे. (Imtiaz Jalil)
 
हेही वाचा : Prithviraj Chavan :“ट्रम्प भारतीय पंतप्रधानांचे अपहरण करतील का?”; पृथ्वीराज चव्हाण यांचे पुन्हा वादग्रस्त विधान
 
विशेष म्हणजे, हा हल्ल्याचा प्रयत्न एमआयएममधील नाराज गटाकडून झाल्याचा आरोप केला जात आहे. धावत्या कारच्या मागे पळत जलील यांना बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा आहे. घटनेनंतर पोलिसांकडून परिसरात तपास सुरू असून, संबंधित कार्यकर्त्यांची चौकशी केली जात आहे. (Imtiaz Jalil)
 
दरम्यान, इम्तियाज जलील यांनी या प्रकरणासाठी कलीम कुरेशी यांच्यावर आरोप केला आहे. कुरेशी हे प्रभाग ९ मधून वंचित बहुजन आघाडीचे, तर प्रभाग १४ मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. एमआयएमने यंदा संभाजीनगरमध्ये २२ विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्या उमेदवारांना संधी दिल्याने पक्षात आधीपासूनच असंतोष होता. त्याचेच पडसाद आता उघडपणे रस्त्यावर दिसू लागले आहेत. (Imtiaz Jalil)
 
 
Powered By Sangraha 9.0