मुंबई : ( Chitra Wagh ) "भाजपवर बोलताना कामाठीपुराचा उल्लेख करणे म्हणजे ही फक्त राजकीय टीका नाही तर संजय राऊत यांची भाषा आणि त्यांच्या विचारांची झलक आहे.त्यामुळे त्यांनी स्वतः एकदा आरशात स्वतःचे काय प्रतिबिंब दिसते ते पाहावे." असे प्रत्युत्तर भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी बुधवार दि.७ रोजी संजय राऊत यांच्या टीकेला दिले.
"वेळ न घालवता राऊत यांनी त्यांच्या पराभवाची स्क्रिप्ट आताच लिहायला घ्यावी. मुद्दे,धोरण,विकास यावर बोलण्याची ताकद उरलेली नाही आहे.म्हणून अशा गलिच्छ उपमा दिल्या जात आहेत.सत्ता गेल्यानंतर भाषा बदलते हेच यातून दिसते आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार असलेला हा महाराष्ट्र तुमच्या या भाषेला ,या घाणेरड्या विचारांना आणि तुमच्या पक्षाला पुन्हा एकदा अद्दल घडवेल." असे प्रतिपादन वाघ यांनी केले.