Bangladesh Protest : बांगलादेशात हिंदू महिला जिल्हाधिकारीना कट्टरपंथींनी धमकावले

06 Jan 2026 14:57:15
 
Bangladesh Protest
 
मुंबई : (Bangladesh Protest) बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. कुठे हिंदूंना मारहाण करून ठार मारले जात आहे, तर कुठे त्यांची घरे जाळली जात आहेत. आता हे अत्याचार मोठ्या पदांवर असलेल्या हिंदू अधिकाऱ्यांनाही सहन करावे लागत आहेत. जमात-ए-इस्लामीकडून एका हिंदू महिला जिल्हाधिकारीना धमकावले जात असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. (Bangladesh Protest)
 
हेही वाचा :  Suresh Kalmadi: माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन: पुण्याने अनुभवी नेते गमावले
 
 मिळालेल्या माहितीनुसार, या धमक्या जिल्हाधिकारी अन्नपूर्णा देबनाथ यांना जमातच्या उमेदवार बॅरिस्टर सालेही यांचे नामांकन रद्द केल्यामुळे मिळत आहेत. सालेही याच्यावर बांगलादेश आणि ब्रिटन या दोन्ही देशांचे नागरिकत्व असल्याचा आरोप होता, म्हणून त्यांचे नामांकन रद्द करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी अन्नपूर्णा यांनी कायद्याप्रमाणे सालेही यांचे नामांकन रद्द केले. मात्र, यामुळे जमात-ए-इस्लामीचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन गोंधळ घातला आणि देशाबाहेर हाकलून देण्याच्या धमक्याही दिल्या. जिल्हाधिकारीं विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. (Bangladesh Protest)
 
बांगलादेशचे सामाजिक कार्यकर्ते बप्पादित्य बसु यांनी हिंदुविरोधी अत्याचारांचा निषेध करत इशारा दिला की, जर हा प्रकार असाच सुरू राहिला, तर काहीच वर्षांत बांगलादेशातील हिंदूंचे अस्तित्वच नष्ट होईल. त्यांनी आरोप केला की मोहम्मद युनूस यांचे सरकार हिंदूंच्या हत्यांना अप्रत्यक्ष पाठबळ देत आहे. (Bangladesh Protest)
 
 
Powered By Sangraha 9.0