मुंबई : (Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी ४ जानेवारीला यांनी 'टुथ सोशल'वर अशा देशांची एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्या देशांतून आलेले स्थलांतरित अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सरकारी मदतीवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे, या यादीत भारताच्या शेजारील पाकिस्तान, भूतान, चीन, बांगलादेश आणि नेपाळसह अनेक देशांची नावे झळकत असली तरी, भारताचे नाव मात्र या यादीत कुठेही नाही.
काय आहे ही 'वेल्फेअर लिस्ट'?
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'Immigrant Welfare Recipient Rates by Country of Origin' या नावाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये जगभरातील जवळपास सुमारे १२० देशांची आकडेवारी समाविष्ट करण्यात आहे. ही यादी अशा देशांची आहे ज्यांचे नागरिक अमेरिकेत आल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहण्याऐवजी अमेरिकन सरकारच्या अन्न, आरोग्य आणि आर्थिक मदत योजनांचा सर्वाधिक लाभ घेतात.
ट्रम्प यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताचे शेजारील देश अमेरिकेच्या तिजोरीवर मोठा भार टाकत असल्याचे दिसून येते. याउलट, या यादीत भारताचे नाव नसणे हे सिद्ध करते की अमेरिकेत राहणारे भारतीय नागरिक हे सरकारी मदतीवर अवलंबून नसून ते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारे महत्त्वाचे घटक आहेत.
भारताचे नाव का नाही?
प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, भारतीय अमेरिकन समुदाय हा अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि उच्चशिक्षित समुदायांपैकी एक आहे. भारतीय कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे १,५१,२०० डॉलर्स आहे, जे इतर कोणत्याही स्थलांतरित समुदायापेक्षा कितीतरी जास्त आहे. बहुतांश भारतीय हे आयटी, औषधनिर्माण आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे भारतीय नागरिकांना सरकारी मदतीची गरज भासत नाही.
शेजारील देशांची स्थिती काय?
भूतानः ८१.४% (सर्वात जास्त मदत घेणारा देश)
बांगलादेशः ५४.८%
पाकिस्तानः ४०.२%
नेपाळः ३४.८%