Chhatrapati Sambhajinagar : ५ हजारांची साडी ₹१९९ ला! छत्रपती संभाजीनगरमध्ये सवलतीमुळे चेंगराचेंगरी, तीन महिला बेशुद्ध; दुकान तात्पुरते बंद

05 Jan 2026 17:16:19
 Chhatrapati Sambhajinagar
 
मुंबई : (Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर शहरात साड्यांवरील आकर्षक सवलतीमुळे 'टेंज' या दुकानाबाहेर महिलांची प्रचंड गर्दी झाली असून, त्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित दुकान तात्पुरते बंद करण्यात आले. (Chhatrapati Sambhajinagar)
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, पाच हजार रुपयांची साडी अवघ्या १९९ रुपयांत मिळत असल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या जाहिरातीमुळे मोठ्या संख्येने ग्राहकांनी दुकानाकडे धाव घेतली. गर्दी अनियंत्रित झाल्याने तीन महिला बेशुद्ध पडल्या, तर दोन ते तीन महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. (Chhatrapati Sambhajinagar)
 
हेही वाचा : महाराष्ट्र सरकार आणि अबू धाबी पोर्ट्स कराराला गती 
 
संक्रांतीचा सण जवळ आल्याने महिलांचा साड्या खरेदीकडे कल वाढला आहे आणि त्यातच अतिशय कमी किमतीत साड्या मिळत असल्याने ग्राहकांची झुंबड उडाली. या घटनेनंतर आजपासून दुकानाबाहेर बाऊन्सर्स तैनात करण्यात आले असून, गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, महिलांसोबतच पुरुषांच्या कपड्यांवरही सवलत असल्याने या दुकानाबाहेर पुरुष ग्राहकांचीही मोठी रांग पाहायला मिळाली. (Chhatrapati Sambhajinagar)
 
 
Powered By Sangraha 9.0