BMC Election: बंडखोरीनंतर शिल्पा केळुस्कर अडचणीत; हायकोर्टात याचिका, उमेदवारी रद्द करण्याची मागणी

05 Jan 2026 12:43:08
 
BMC Elections
 
मुंबई : (BMC Election) मुंबईतील प्रभाग क्रमांक १७३मध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत थेट लढत रंगली असतानाच मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. बंडखोरी केल्यानंतर भाजपच्या अधिकृत उमेदवार ठरलेल्या शिल्पा केळुस्कर यांच्या उमेदवारीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पूजा कांबळे यांचे पती आणि माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी ही याचिका दाखल केली असून, शिल्पा केळुस्कर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. (BMC Election)
 
याचिकेत शिल्पा केळुस्कर यांच्यावर भाजपाच्या कार्यालयातून एबी फॉर्म चोरल्याचा आणि बनावट (कलर झेरॉक्स) एबी फॉर्म वापरून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याआधीच या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात शिल्पा केळुस्कर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे. (BMC Election)
 
हेही वाचा :  Waris Pathan : कलमाचे पठण करणारी मुस्लिम महिला महापौर का होऊ शकत नाही? : वारिस पठाण
 
प्रकरण नेमके काय?
 
प्रभाग क्रमांक १७३ ची जागा युतीतील जागावाटपानुसार शिवसेना शिंदे गटाला मिळाली असून, या ठिकाणी पूजा कांबळे या अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर शिल्पा केळुस्कर यांनी थेट बनावट एबी फॉर्मच्या आधारे निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला. धक्कादायक बाब म्हणजे हा अर्ज वैधही ठरवण्यात आला, त्यामुळे भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढली. (BMC Election)
 
भाजपच्या नेत्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर आमदार अमित साटम यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. भाजपने सुरुवातीला शिल्पा केळुस्कर यांना एबी फॉर्म दिला होता, मात्र नंतर तो काढून घेण्यात आला. त्यानंतरही शिल्पा केळुस्कर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म तयार करून तो उमेदवारी अर्जासोबत जोडल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे प्रभाग १७३ मधील निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता असून, उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (BMC Election)
 
 
Powered By Sangraha 9.0