मुंबई : (Avinash Jadhav) ठाण्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बिनविरोध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. आज सोमवार दि. ५ जानेवारी रोजी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ठाण्यात बिनविरोध निवडून आलेल्या सर्व प्रकरणांची सविस्तर लेखाजोग माहिती मांडली. निवडणूक आयुक्तांनी ही बाब काळजीपूर्वक समजून घेतली असून, यावर लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. (Avinash Jadhav)
हेही वाचा : BMC Election: बंडखोरीनंतर शिल्पा केळुस्कर अडचणीत; हायकोर्टात याचिका, उमेदवारी रद्द करण्याची मागणी
यावेळी अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “फॉर्म मागे घेण्यासाठी थेट विधानसभेचे अध्यक्ष उभे राहून धमक्या देतात, तरी तुम्हाला अजून किती पुरावे हवेत?” असा थेट सवाल त्यांनी केला. निवडणूक बिनदबाव आणि योग्य पद्धतीने होत असल्याचा दावा केला जात असेल, तर अशा घटनांचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Avinash Jadhav)
त्यासोबतच, ठाण्यातील ६८ जागांचा निकाल चौकशी पूर्ण होईपर्यंत राखून ठेवावा, अशी मागणी आयोगाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. (Avinash Jadhav)