Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड

31 Jan 2026 14:54:34

Sunetra Pawar 
 
मुंबई: (Sunetra Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) विधायक दलाची शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून इतिहास घडवणार आहेत. (Sunetra Pawar)
 
हेही वाचा :  Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
 
दुपारी २ वाजता झालेल्या या बैठकीत सर्वप्रथम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले. छगन भुजबळ यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. कोणताही विरोध न होता एकमताने त्यांची निवड झाली. (Sunetra Pawar)
 
गटनेतेपदाच्या निवडीचे अधिकृत पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर सुनेत्रा पवार आजच राज्यसभा खासदारकीचा राजीनामा सुपूर्द करतील. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभा जागेवर पार्थ पवार यांना पाठवण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचे माध्यमांवरून सांगण्यात येत आहे. (Sunetra Pawar)
 
 
Powered By Sangraha 9.0