Sharad Pawar: "शपथविधीबाबत मला काहीही...": शरद पवार

31 Jan 2026 13:47:25
 
Sharad Pawar
 
मुंबई: (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले असून, पक्षातील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आलं आहे. (Sharad Pawar)
 
शपथविधीच्या काही तास आधीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला काहीही माहिती नाही. या निर्णयात मी सहभागी नव्हतो. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षांतर्गत निर्णय घेतला असावा,” असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. (Sharad Pawar)
 
हेही वाचा :  Sunetra Pawar: देवगिरी बंगल्यावर एनसीपी नेत्यांची सुनेत्रा पवारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; अध्यक्षपद आणि राज्यसभा राजीनाम्यावर चर्चा?
 
शरद पवारांच्या या स्पष्ट आणि धक्कादायक भूमिकेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शपथविधी इतक्या घाईघाईत का घेतला जातोय, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार हे बारामतीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी गोविंदबागेत दाखल झाले आहेत. मागील सव्वा एक तासापासून शरद पवार यांच्यासोबत बंद दाराआड बैठक सुरू आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार आणि रणजीत पवार हेही उपस्थित आहेत. (Sharad Pawar)
 
दरम्यान, सुनेत्रा पवारांचा शपथविधी तातडीने घेण्यामागचं कारण आता समोर आलं आहे. माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात संभाव्य फूट टाळण्यासाठी हा शपथविधी तात्काळ घेण्यात येत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील एका गटात अस्वस्थता वाढली असून, आधीपासूनच फुटीच्या स्थितीत असलेला हा गट अधिक सक्रिय होण्याची शक्यता होती. ही संभाव्य पक्षफूट रोखण्यासाठी आणि नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी तातडीने घेण्याचा निर्णय घेतल्याचं माध्यमांवरून समजत आहे. (Sharad Pawar)
 
 
Powered By Sangraha 9.0