Parth Pawar : सुनेत्रा पवारांचा मुंबईत शपथविधी; तर, पार्थ पवार बारामतीत शरद पवारांच्या भेटीला, नेमकं चाललंय काय?

31 Jan 2026 12:07:48
 
Parth Pawar
 
बारामती: (Parth Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणात संध्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. पार्थ पवार हे बारामतीतील गोविंदबाग येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. सुनेत्रा पवार यांचा आज शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे एनसीपीतील अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. (Parth Pawar)
 
हेही वाचा:  Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी उद्याच होणार शपथविधी? चर्चांना उधाण!
 
दरम्यान, सुनेत्रा पवार आज मुंबईत दाखल झाल्या असून त्या देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर सुनेत्रा पवार यांचा आज संध्याकाळी ५ वाजता शपथविधी होणार आहे. (Parth Pawar)
 
राजकीयदृष्ट्या हा क्षण एनसीपीसाठी निर्णायक मानला जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात एकीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. अशा पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार आहे. एनसीपीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत दिले आहेत. (Parth Pawar)
 
 
Powered By Sangraha 9.0