Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रश्नचिन्ह; व्हायरल फोटोमुळे राजकारणात मोठा ट्विस्ट

31 Jan 2026 15:56:27
Ajit Pawar
 
मुंबई : (Ajit Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होत्या. या संदर्भात अनेक पातळ्यांवर बैठका झाल्याचीही माहिती समोर आली होती. (Ajit Pawar)
 
दरम्यान, अजित पवार गटातील नेत्यांकडून सध्या दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नसल्याचे संकेत दिले जात असतानाच, सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा फोटो विलिनीकरणाच्या अंतिम बैठकीचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा फोटो नेमका अंतिम बैठकीचाच आहे की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. तरीही या फोटोमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Ajit Pawar)
 
Ajit Pawar 
 
हेही वाचा : Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड
 
या व्हायरल फोटोमध्ये शरद पवार, अजित पवार, राजेश टोपे, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह शरद पवार गटातील इतर वरिष्ठ नेते दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे या बैठकीत अजित पवार हे आपल्या गटाच्या वतीने एकटेच चर्चेत सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे. आपल्या शब्दावर पक्षातील इतर नेते तयार होतील, असा विश्वास अजित पवारांनी पवार गटाला दिल्याचेही बोलले जात आहे. (Ajit Pawar)
 
या फोटोवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा फोटो १७ जानेवारी रोजी बारामतीतील बैठकीतील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही कोणतीही औपचारिक राजकीय बैठक नव्हती, तर कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने बारामतीत असताना झालेली अनौपचारिक भेट होती, असे टोपे यांनी सांगितले. शरद पवार यांनी अजित पवार यांना नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते आणि त्यावेळी सहज गप्पा झाल्या, असेही त्यांनी सांगितले. (Ajit Pawar)
 
 
Powered By Sangraha 9.0