Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

31 Jan 2026 14:05:54


 
Ajit Pawar
 
नवी मुंबई : (Ajit Pawar) भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी नवी मुंबई येथे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. (Ajit Pawar)

 
श्रद्धांजली कार्यक्रमावेळी वातावरण अत्यंत शोकाकुल होते. उपस्थित मान्यवरांनी दोन मिनिटांचे मौन पाळून स्वर्गीय अजित पवार यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना केली. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. (Ajit Pawar)
 

Powered By Sangraha 9.0