अहमदाबाद : (Mumbai–Ahmedabad Bullet Train Project) मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत (Mumbai–Ahmedabad Bullet Train Project) अहमदाबाद जिल्ह्यात भूमिगत मेट्रो टनेलवर १०० मीटर लांबीचा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. या पुलाचे सर्व स्टील स्ट्रक्चर महाराष्ट्रातील वर्धा येथील कार्यशाळेत तयार करण्यात आले आणि ट्रेलर्सद्वारे अहमदाबादपर्यंत नेण्यात आले. यामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत देशांतर्गत उत्पादन क्षमता आणि भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचे सामर्थ्य अधोरेखित झाले आहे. हा गुजरातमधील नियोजित असलेल्या एकूण १७ स्टील पुलांपैकी १३ वा स्टील पूल आहे. या कामांसह बुलेट ट्रेन प्रकल्पालाही गती मिळते आहे.(Mumbai–Ahmedabad Bullet Train Project)
अहमदाबाद जिल्ह्यात बुलेट ट्रेनचा (Mumbai–Ahmedabad Bullet Train Project) व्हायाडक्ट साधारणतः ३० ते ५० मीटर लांबीच्या स्पॅन-बाय-स्पॅन रचनेत उभारण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी बुलेट ट्रेनचा मार्ग कालूपूर आणि शाहपूर मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या भूमिगत मेट्रो टनेलवरून जात असल्याने विशेष अभियांत्रिकी उपाययोजना कराव्या लागल्या. मेट्रो टनेलवर कोणताही अतिरिक्त भार पडू नये यासाठी पुलाचे पाया टनेलपासून सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी स्पॅन सुमारे १०० मीटरपर्यंत वाढवावा लागला आणि संपूर्ण रचना स्पॅन-बाय-स्पॅन व्हायाडक्टऐवजी स्टील ट्रस ब्रिज स्वरूपात पुन्हा डिझाइन करण्यात आली. या बदलामुळे बुलेट ट्रेन मार्ग आणि मेट्रो दोन्ही पायाभूत सुविधांची संरचनात्मक सुरक्षितता अबाधित राहिली आहे. हा भव्य स्टील पूल जमिनीपासून सुमारे १६.५ मीटर उंचीवर तात्पुरत्या ट्रेसल्सवर जोडण्यात आला.(Mumbai–Ahmedabad Bullet Train Project)
सुमारे १,०९८ मेट्रिक टन वजनाचा हा पूल अहमदाबाद–साबरमती पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गालगत उभारण्यात आला आहे. पुलाची उंची १४ मीटर असून रुंदी १५.५ मीटर आहे. या पुलाच्या उभारणीसाठी स्थळावर ११.५ मीटर रुंद आणि १०० मीटर लांबीचा तात्पुरता प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला होता. संपूर्ण संरचनेत सुमारे ४५,१८६ टॉर-शिअर टाईप हाय स्ट्रेंथ बोल्ट्सचा वापर करण्यात आला असून, दीर्घकाळ टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी C5 सिस्टिमचे संरक्षक रंगकाम करण्यात आले आहे. तसेच इलास्टोमेरिक बेअरिंग्सचा वापर करून पुलाची स्थिरता, दीर्घ सेवा आयुष्य आणि प्रवासी सुरक्षितता अधिक मजबूत करण्यात आली आहे.(Mumbai–Ahmedabad Bullet Train Project)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.