Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी उद्याच होणार शपथविधी? चर्चांना उधाण!

30 Jan 2026 20:35:52
Sunetra Pawar
 

मुंबई : (Sunetra Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याविषयी चर्चा सुरु असून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याची मागणी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजित पवार यांच्याकडे असलेली खाती राष्ट्रवादीकडेच असावी. तसेच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचे समजते.(Sunetra Pawar)
 
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांची निवड होणार असुन शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी त्यांची शपथविधी सायंकाळी ५ वाजता पार पडण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.(Sunetra Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन, उत्पादन शुल्क आणि क्रीडा अशी तीन खाती होती. ही खाती राष्ट्रवादीकडेच राहावी, अशी पक्षाची इच्छा आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास सव्वातास चर्चा झाली. दरम्यान, शनिवारी उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचेही समजते.(Sunetra Pawar)
मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, "अजितदादांकडे असलेल्या जागांचा आम्हाला निर्णय करावा लागणार आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या आमदारांना बोलवून जनभावनेचा आदर करून लवकरात लवकर निर्णय करायचा आहे, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले." तर, सुनील तटकरे म्हणाले की, "धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व परिवाराशी चर्चा करून आम्ही ठरवू. जनतेच्या आणि आमदारांच्या मनातले वहिनींसोबत बोलणे अत्यंत महत्वाचे आहे. दादांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकमग्न आहे. दादांचे सर्व पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यामुळे आम्ही अत्यंत शोकाकुल आणि दु:खद वातावरणात आहोत. बाकी विषयांवर कुठलीही चर्चा नाही. मुख्यमंत्र्यांशी आमची भेट झाली."(Sunetra Pawar)
 
हेही वाचा : Ajit Pawar Plane Crash: "...तर असं काही घडलंच नसतं", २७ वर्षे अजित पवारांसोबत असलेल्या ड्रायव्हरनं सांगितला तो शेवटचा संवाद
 
विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती
 
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "उद्या आमच्या विधानमंडळांच्या सदस्यांची बैठक बोलवली आहे. त्यात विधिमंडळ नेते पद देण्यासंदर्भात निर्णय होईल. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे ते पद द्यावे, असे आपण ऐकतो आहोत. ते चूक आहे असे मला वाटत नाही. उपमुख्यमंत्री पदाची जागा सुनेत्रा वहिनींद्वारे कशी भरता येईल, याकडे सध्या आमचे लक्ष आहे. बाकीचे पुढे बघता येईल. उद्या आमची विधिमंडळ पक्षाची बैठक असून यावर एकमत झाल्यास उद्या शपथविधी होऊ शकतो," असे त्यांनी सांगितले.(Sunetra Pawar)
 
दरम्यान, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिला असल्याचीही माहिती पुढे आली आहे. आज (शनिवार) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. सुनेत्रा पवार यांच्या रूपात महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.(Sunetra Pawar)
 
अर्थसंकल्प कोण मांडणार?
 
येत्या २३ फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पाबाबात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी बैठका घेण्याचे नियोजन केले होते. परंतूं त्यांच्या अकाली निधनामुळे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे समजते. याबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, "अजितदादांनी अर्थसंकल्पाबद्दल बराचसा अभ्यास केला होता. त्या संदर्भात पुढील काय निर्णय असेल तो पाहून कळवू"

काय म्हणाले मुख्यमंत्री?

दरम्यान राज्यातील या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही म्हणणे असेल त्यानुसार आम्ही पाठीशी आहोत. त्यांच्या या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्व सोबतच राहू, अशी माहिती त्यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली. 

 
 
Powered By Sangraha 9.0