DLLE UDAAN 2025–26 : UDAAN 2025–26 मध्ये DLLE विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

    30-Jan-2026
Total Views |
DLLE UDAAN 2025–26
 
मुंबई : (DLLE UDAAN 2025–26) मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित UDAAN 2025–26 (DLLE UDAAN 2025–26) या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवात स्म्ट. के. एल. तिवारी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग (DLLE) मधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.(DLLE UDAAN 2025–26)
 
विद्यापीठ स्तरावरील या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विविध कला, साहित्य व सामाजिक विषयांवरील सादरीकरणांचा समावेश होता. DLLE (DLLE UDAAN 2025–26) च्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदवित पवाडा गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तसेच सर्जनशील लेखन स्पर्धेत सांत्वन पारितोषिक पटकावले.(DLLE UDAAN 2025–26)
 
पवाडा गायन सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक आशय प्रभावीपणे मांडला. पथनाट्य सादरीकरणामध्ये सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत वास्तववादी सादरीकरण केल्याने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेण्यात आले. सर्जनशील लेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी समकालीन विषयांवर विचारप्रवर्तक लेखन सादर करून दखल मिळवली.(DLLE UDAAN 2025–26)
 
हेही वाचा :  राष्ट्रीय आशियाई कला संग्रहालय शिव नटराजासह तीन ऐतिहासिक मूर्ती भारताला परत करणार
 
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, सराव आणि संघभावना कारणीभूत ठरली. तसेच DLLE (DLLE UDAAN 2025–26) अंतर्गत कार्यरत प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियोजनबद्ध तयारी आणि महाविद्यालय व्यवस्थापनाचा पाठिंबा यामुळे विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळाले.(DLLE UDAAN 2025–26)
 
या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. DLLE (DLLE UDAAN 2025–26) समितीच्या समन्वयक सहायक प्राध्यापक माधुरी यादव, सह-समन्वयक डॉ. सूर्यभूषण मिश्रा, सदस्य डॉ. पूजा बारड व सहायक प्राध्यापक सेजल विश्वकर्मा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यवाहक प्राचार्य डॉ. दीप्ती साडवेलकर यांनीही विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केले असून भविष्यात अशाच उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन केले आहे.(DLLE UDAAN 2025–26)