Mallikarjun Kharge : दिल्ली कोर्टाकडून मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस

30 Jan 2026 15:40:22
Mallikarjun Kharge

मुंबई : (Mallikarjun Kharge) कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक टिप्पणी केली होती. याबाबत आलेल्या तक्रारीवरून दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने खर्गे यांना नोटीस पाठवली आहे. याबाबतची पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती आहे.(Mallikarjun Kharge)
 
हाती आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील २०२३ सालच्या निवडणूक प्रचारात मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी रा. स्व. संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रक्षोभक आणि द्वेषपूर्ण वक्तव्य केले होते. यावरून दिल्लीतील रवींद्र गुप्ता नावाच्या व्यक्तीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या तक्रारीवर सुनावणी करताना न्यायालयाने खर्गे यांना नोटीस पाठवून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले.(Mallikarjun Kharge)
 
हेही वाचा : सौदी अरेबियाकडून पहलगाम दहशतवादी हल्ला व लाल किल्ल्याजवळील दहशतवादी घटनेचा तीव्र निषेध 
 
याचिकाकर्त्याने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे भाषण केवळ आक्षेपार्ह नव्हते तर त्यातून समाजात द्वेष पसरवण्याची भावना होती. त्यामुळे कायदेशीर कारवाई आवश्यक आहे.(Mallikarjun Kharge)
 
रवींद्र गुप्ता यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तक्रार दाखल केली असता न्यायालयाने तक्रार दखल घेण्यास नकार दिला आणि याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या निर्णयावर असमाधानी होऊन रवींद्र गुप्ता यांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयातील सत्र न्यायालयात आव्हान दिले.(Mallikarjun Kharge)
 
 
Powered By Sangraha 9.0