Ajit Pawar Plane Crash: "...तर असं काही घडलंच नसतं", २७ वर्षे अजित पवारांसोबत असलेल्या ड्रायव्हरनं सांगितला तो शेवटचा संवाद

30 Jan 2026 15:11:00

Ajit Pawar
मुंबई : (Ajit Pawar Driver Shyamram Manve Emotional Statement) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी २८ जानेवारी रोजी सकाळी बारामतीत विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर गुरुवारी २९ जानेवारी रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, "अजित पवारांनी त्यावेळी ऐकलं असतं तर हा अनर्थ घडलाच नसता, त्यांचा जीव आज वाचला असता", असे सांगताना अजित पवारांच्या गाडीचे चालक श्यामराव मनवे यांनी सांगितले आहे. अपघाताच्या आदल्या रात्री काय झालं होतं याची माहिती मनवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.(Ajit Pawar Driver Shyamram Manve Emotional Statement)

२७ वर्षे अजितदादांची सावलीसारखी सोबत
श्यामराव मनवे हे अजित पवारांच्या गाडीचे चालक आहेत. अजित पवारांची सावली म्हणूनच त्यांची ओळख आहे. गेल्या २७ वर्षांपासून ते अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य करत आहेत. जिथे अजित पवार तिथे श्यामराव असे जणू समिकरण जुळले होते. ज्यावेळी अजित पवारांचा अपघात झाला त्यावेळी श्यामराव हे मुंबईत अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर होते. त्यांना कुणी तरी अपघात झाल्याची बातमी दिली. पण त्यावर त्यांचा विश्वासच बसला नाही, असे मनवे यांनी सांगितले.
 
 तू बाय रोडने पुण्याला ये, मी सभा आटोपून येतो

यावेळी त्यांनी सांगितले की, मंगळवारी सर्व बैठका लवकर संपल्या होत्या. त्यामुळे मी त्यांना रात्रीच गाडीने पुण्याला जाऊ, असे सुचवले होते. पण त्यांनी जाण्याचे टाळले. त्यांनी मला सांगितलं की, मी विमानाने जातो. दादांच्या पुढे कोण जाणार? दादा मला म्हणाले, तू पुण्याला ये, मी सभा आटोपून पुण्यात येतो; मात्र बुधवारी सकाळीच ही दुर्दैवी घटना घडली. त्यांनी त्यावेळी माझे ऐकले असते तर हा अनर्थ घडलाच नसता, अशा शब्दांत श्यामराव मनवे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सांगितले. (Ajit Pawar Driver Shyamram Manve Emotional Statement)

यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणी ही सांगितल्या. अजितदादा हे कडक स्वभावाचे असले तरी तेवढेच मनाने चांगले होते. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. त्यांच्या जवळ जे काही खाण्यासाठी असेल ते सर्वांना वाटून देत असत. एक लाडू असला तरी ते चार भाग करत असे ही त्यांनी सांगितले. त्यांच्या जाण्याने काही सुचत नाही. विश्वासही बसत नाही. त्यांना सकाळी गाडीपर्यंत सोडायला आपणच गेलो होते असं ही त्यांनी सांगितलं. बारामतीचीच नाही तर महाराष्ट्राची त्यांच्या जाण्याने हानी झाल्याचं ते म्हणाले.(Ajit Pawar Driver Shyamram Manve Emotional Statement)

Powered By Sangraha 9.0