मुंबई : (Navnath Ban) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर भाजपा प्रदेश कार्यालयाने अजितदादा पवार यांच्या श्रध्दांजलीपर प्रसारमाध्यमांत दिलेल्या जाहिरातीवरुन संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली होती.त्यास भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी गुरुवार दि.२९ रोजी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.आपल्या एक्स हॅंडलवरून नवनाथ बन म्हणतात, “एनडीएतील घटक पक्षांत संबंध कसे जपतात हे मविआ आणि संजय राऊत तुम्हाला कळणार नाही. यह तुम्हारे बस की बात नही!’’(Navnath Ban)
ममता बॅनर्जी यांनीही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्देवी निधनावर वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना बुधवार दि. २८ रोजी असे म्हटले होते की,"कुणाच्या मृत्यूवर अशा प्रकारच गलिच्छ राजकारण केल जात आहे,याच मला खुप दुखं आहे की ममतादीदी ज्याप्रकारे राजकारणात खालच्या पातळीवर जात आहेत ते चुकीच आहे."
हेही वाचा : Ajit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली
तर राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणाले की,"आता मात्र मला संजय राऊत यांची किव येऊ लागली आहे.त्यांची मानसिकता कीती विक्षीप्त आहे हे लक्षात येत.अजितदादांसारख्या लोकनेत्याला श्रध्दांजली अर्पण करणे ही राजकीय जाहिरात नव्हे तर जनभावनेचा आदर आहे.श्रध्दांजलीत राजकारण शोधणे ही ठाकरे गटाची संकुचित भावना योग्य नाही.संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्योधनवृत्तीचा माणूस असे मी म्हणतो."(Navnath Ban)
काल स्वता शरद पवार यांनीही या घटनेचे कुणीही राजकारण करु नये असे आवाहन केले होते.तरीही संजय राऊत यांनी यावर पुन्हा राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे भाजपाने राऊत यांना जशास तसे उत्तर दिले आहे.(Navnath Ban)