बारामती विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स हस्तगत

29 Jan 2026 15:16:39
 
मुंबई : (Ajit Pawar Plane Crash) बारामती परिसरात झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तात्काळ सर्व आवश्यक आपत्कालीन प्रतिसाद व तपास यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. या घटनेच्या सखोल, पारदर्शक आणि कालबद्ध चौकशीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.(Ajit Pawar Plane Crash)

दुर्घटनेच्या तपासासाठी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, नवी दिल्ली येथील तीन अधिकाऱ्यांची टीम तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मुंबई प्रादेशिक कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम २८ जानेवारी रोजी घटनास्थळी दाखल झाली. याच दिवशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे महासंचालक जी. व्ही. जी. युगंधर यांनी घटनास्थळाला भेट दिली.(Ajit Pawar Plane Crash)
 
 हेही वाचा : Ajit Pawar Funeral: अजितदादांचा जीवनप्रवास फोटोतून...

चौकशीची प्रक्रिया वेगाने सुरू असून अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स यशस्वीरित्या हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे दुर्घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यास तपास यंत्रणांना मोठी मदत होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ठरवून दिलेल्या कालमर्यादेत, प्रस्थापित मानक कार्यपद्धती आणि लागू मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही चौकशी पूर्ण करण्यात येईल. ही चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो नियम, २०२५ मधील नियम ५ आणि नियम ११ अन्वये सुरू करण्यात आली असून मंत्रालय संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.(Ajit Pawar Plane Crash)
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0