मुंबई : (Punha Ekda Sade Made Teen) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात यांचे दु:खद निधन झाले. बुधवारी अचानक घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण राज्य दु:खाच्या वातावरणात आहे. सामाजिक माध्यमांवर नागरिक, राजकीय वर्तुळ आणि विविध संघटनांनी सामाजिक माध्यामांद्वारे पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही अपघाताबाबत आपलं दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
या महिन्याच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज असलेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ (Punha Ekda Sade Made Teen) हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या नियोजित तारीखेला प्रदर्शित होऊ शकणार नाही. चित्रपट दिग्दर्शक अंकुश चौधरी आणि त्यांच्या टीमने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शोकाच्या काळात संवेदनशीलता आणि सामाजिक भावनेची दखल घेऊन या आगामी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.(Punha Ekda Sade Made Teen)
हेही वाचा : अजित पवारांचे सिनेविश्वाशी होते खास संबंध, नव्या फिल्मसीटीसाठीही दिली होती जागा
चित्रपटच्या टीमने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे, या दुःखद प्रसंगात आम्हीही शोकभावनेत सहभागी आहोत. त्यामुळे संवेदनशीलतेची जाणीव ठेवत आमच्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.”(Punha Ekda Sade Made Teen)
आता अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ (Punha Ekda Sade Made Teen)हा चित्रपट नवीन प्रदर्शनाची तारीख कधी असेल, हे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. चित्रपटाच्या रिलीजसंबंधीचे नवीन अपडेट टीमकडून देण्यात येणार आहेत.(Punha Ekda Sade Made Teen)