Ram Shinde : अजित पवार यांचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल - विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

29 Jan 2026 19:18:11
Ram Shinde
 
मुंबई : (Ram Shinde) वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, प्रशासनिक नैपुण्य, संवेदनशील नेतृत्व आणि या सर्वांचा आधार असलेले धडाडीचे विकासोन्मुख राजकारण, असे अजितदादा पवार यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वाचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशा शब्दात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आदरांजली वाहिली.(Ram Shinde)
 
हेही वाचा : अजित पवारांचे सिनेविश्वाशी होते खास संबंध, नव्या फिल्मसीटीसाठीही दिली होती जागा
 
प्रा. राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले की, "दिलेला वेळ आणि शब्द पाळणारे, अशी ख्याती असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अचानक वेळेआधी आपल्याला सोडून गेले. दिनांक २८ जानेवारीचा दिवस या अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटनेने उजाडला, ज्यामुळे आपण सर्वच शोकमग्न झालो आहोत. अजितदादा आपल्यात नाहीत हे स्वीकारायला मन अजूनही तयार नाही, इतकी ही घटना अनपेक्षित आणि खोल वेदनादायी आहे. वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, प्रशासनिक नैपुण्य, संवेदनशील नेतृत्व आणि या सर्वांचा आधार असलेले धडाडीचे विकासोन्मुख राजकारण, असे त्यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वाचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. पवार कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. अजितदादा यांना आणि या दुर्दैवी विमान अपघात घटनेत प्राण गमवावे लागलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली."(Ram Shinde)
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0