Colombia plane crash: कोलंबिया-व्हेनेझुएला सीमेवर भीषण विमान अपघात; १५ जण ठार, मृतांमध्ये दोन वरिष्ठ राजकीय नेत्यांचा समावेश

29 Jan 2026 17:10:09
 
Colombia plane crash
 
कुकुटा : (Colombia plane crash) कोलंबिया आणि व्हेनेझुएलाच्या सीमेवर असलेल्या नॉर्टे दे सँटान्डर प्रांतात बुधवारी २८ जानेवारी रोजी दुपारी झालेल्या भीषण विमान अपघातात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला. ‘सॅटेना एअरलाइन्स’च्या फ्लाइट क्रमांक ८८९५ या प्रवासी विमानाचा अपघात झाला असून, हे विमान कुकुटा शहरातून ओकाना शहराकडे जात असताना लँडिंगपूर्वीच एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटला आणि काही वेळातच विमान दुर्गम डोंगराळ भागात कोसळल्याची माहिती समोर आली. (Colombia plane crash)
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात एकूण १३ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून कोणाचाही जीव वाचू शकला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, बचाव पथके आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र डोंगराळ आणि दुर्गम भाग असल्यामुळे शोध व बचाव कार्यात अडथळे आले. काही तासांच्या शोध मोहिमेनंतर विमानाचे अवशेष सापडले आणि सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. (Colombia plane crash)
 
हेही वाचा : Ajit Pawar Funeral: अजित पवारांच्या अंत्यसंस्कारात सूरज चव्हाणचा हृदयद्रावक क्षण; जळत्या चितेसमोर टेकवले डोके, भावनिक व्हिडीओ व्हायरल
 
या अपघातात कोलंबियाच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. मृतांमध्ये कोलंबियाच्या संसदेचे विद्यमान सदस्य डायोजेनेस क्विंटेरो यांचा तसेच आगामी निवडणुकीतील प्रमुख उमेदवार कार्लोस साल्सेडो यांचा समावेश आहे. या दोघांच्या निधनाने कोलंबियाच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून विविध पक्षांनी शोक व्यक्त केला आहे. (Colombia plane crash)
 
दरम्यान, अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. खराब हवामान, तांत्रिक बिघाड किंवा मानवी चूक यापैकी कोणतं कारण जबाबदार आहे, याचा तपास सुरू असल्याचं नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या भीषण अपघाताने पुन्हा एकदा हवाई सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. (Colombia plane crash)
 
 
Powered By Sangraha 9.0